अंबाजोगाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परीवर्तनाची पत्रकारीता केली- ॲङ संदीप थोरात

अंबाजोगाई: पुर्वी विशिष्ट लोक पत्रकारिता करत असल्याने त्यांना इतर समाजाचे देणे- घेणे नव्हते, यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “मूकनायक” च्या माध्यमातून सर्व जाती धर्मांना न्याय देत परीवर्तनाची पत्रकारीता केली असे प्रतिपादन ॲङ संदीप थोरात यांनी केले. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘मूकनायक’ दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी ग्रामविकास राज्यमंत्री अ‍ॅड. पंडितराव दौंड, स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे उपस्थित होते.  पुढे बाेलतांना अ‍ॅड. संदिप थोरात म्हणाले की, तत्कालीन व्यवस्थेमध्ये बहुजनाला कसलेही स्थान नव्हते. पत्रकारीतेतून त्यांना बाजूला ठेवले जात असल्याने बहुजनांचा आवाज दाबला जात होता. आजही बहुजन पत्रकारांन विशेष स्थान दिले जात नसल्याचे दिसून येते.  समाज माध्यमांनी दैनीकांची मक्तेदारी मोडून काढली असून समाजातील खरे वास्तव समाज माध्यमांमुळे पुढे येत आहे असे ते म्हणाले. यावेळी बोलताना माजी ग्रामविकास राज्यमंत्री अ‍ॅड. पंडितराव दौंड म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्धीचे किंवा लोकांपर्यंत पोहचण्याचे आणि चळवळीला बळकटी देण्याचे माध्यम नव्हते. अशा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक या वृत्तपत्राची सुरुवात करुन त्या काळात समाजजागृतीचे काम केले.                                             कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की, बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांना समन्यायाची भुमिका प्राप्त करून दिली. ज्याची उतराई येणाऱ्या हजारो वर्षातसुद्धा होणार नसल्याचे मोदी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर गित्ते यांनी केले तर बहारदार सुत्रसंचालन रचना परदेशी हिने केले. आभार अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ पत्रकार जगन सरवदे, प्रा. प्रदिप तरकसे, दादासाहेब कसबे, रोहिदास हातागळे, धनंजय जाधव, सचिव गणेश जाधव, दत्ता वालेकर, रत्नदीप सरवदे यासह आदींनी परिश्रम घेतले.

मूकनाय पुरस्कार प्रदान

यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार हा मुंबई येथील क्राईम इडिटर सुधाकर कश्यप यांना प्रदान करण्यात आला. कश्यप हे तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे हा पुरस्कार त्यांचे प्रतिनिधी राहूल गजभार यांना देण्यात आला. तसेच समाजातील वेगवेगळ्या घटकात आदर्शवत काम करणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. ज्यामध्ये घांटनांदूर येथील सेवा आश्रमचे प्रमुख नामदेव दहिवाळ, अलहाज मोहम्मद अब्दुल हकीम, डॉ. क्रांती सिरसाट, राजेंद्र घोडके, प्राचार्य. डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. डॉ. इंद्रजित भगत, डॉ. संतोष बोबडे, दिपक जाधव, अंकिता महिला बचतगट यांचा सन्मान करण्यात आला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!