
अंबाजोगाई: राज्यातल्या महावितरण कंपनीने १ शेतकरी एक डीपी (एचव्हीडीसी) अंतर्गत मंजुर करण्यात आली होती. याच धर्तीवर महाविरणच्याच कर्मचार्याने अधिकृत अनामत रक्कम भरून ही विजजोडणी मिळविली. परंतु ऑक्टोबर मध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे महातिवरणच्या खांबासह जमिनी वाहुन गेल्या. यावर राज्य सरकारने पीक विम्यासह अनुदान जाहिर केले. परंतु महावितरण कंपनीच्या खांबाचे व डीपीचे झालेले नुकसान अद्यापही दुरूस्त न केल्यामुळे परळी तालुक्यातील वानटाकळी येथील 2 शेतकर्यांचे आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. यातील एक शेतकरी महावितरणचा सेवा निवृत्त कर्मचारी असून त्याच्याच बाबतीत अधिकारी अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्य शेतकर्यांना हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
परळी तालुक्यातील वानटाकळी येथील नामदेव राजाभाऊ गायके व नरसिंग गायके या दोन शेतकर्यांनी एचव्हीडीसी योजनेतर्गंत एक शेतकरी एक डीपी योजना दोघांनी मंजुर करून घेतली त्या प्रमाणे महावितरणने कंत्राटदाराकडून दोन्ही शेतकर्यांना स्वतंत्र 16 के.व्ही.ए.चा ट्रान्सफार्मर व तीन सिमेंट पोल देण्यात आले होते. 3 ऑक्टोबर रोजी 4 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे डी.पी.सह पोलचे अतोनात नुकसान झाले होते. या योजनेतर्गंत ज्या शेतकर्यांनी ही योजना घेतली आहे. त्या शेतकर्यांना पाच वर्ष डी.पी. जळाला तर दुरूस्ती करून देण्याचे कंत्राटात तरतुद आहे. तर नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसान झाले तर त्याची दुरूस्ती करण्याचे काम महावितरण कंपनीचे आहे. परंतु महावितरण कंपनीने या दोन्ही शेतकर्यांच्या विजेच्या दुरूस्तीकडे गेल्या सहा महिन्यांपासुन दुर्लक्ष केल्यामुळे दोन्ही शेतकर्यांचे आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे वीज बील भरले नाही तर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी विज जोडणी बंद करतात. जे शेतकरी वेळेवर वीज बील भरतात अशा शेतकर्यांवरच महावितरण अन्याय करीत असून त्यांना सेवा देण्यामध्ये उदासिनता दाखविलेली आहे. ऑक्टोबर मधील झालेल्या पावसामुळे वाणनदीलगत असलेल्या जमिनी पुर्णतः पावसामुळे वाहुन गेल्या तर महावितरणचे खांब जमिनोदोस्त झाले. जमिनीवर कोसळलेल्या खाबांची दुरूस्ती केली व सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची भरपाई देण्यात आली. तसेच विजेचे खांब देखील दुरूस्त करण्यात आले. परंतु 1 शेतकरी एक डी.पी. (एचव्हीडीएस) या शेतकर्याकडे मात्र परळीच्या महावितरणच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या योजनेतील दोन शेतकर्यांपैकी एक शेतकरी हा महाविरणचा सेवानिवृत्त कर्मचारी असून त्याच्याच बाबतीत असे घडत असेल तर सर्वसामान्य शेतकर्यांना काय न्याय देवू शकतात असा प्रश्न शेतकर्यातून उपस्थित होत आहे.
कर्मचारी असूनच माझ्यावर ही वेळ
महावितरण कंपनीमध्ये चाळीस वर्ष काम करून देखील आमच्याच खात्यातील अधिकारी आमच्या विषयी सुडबुद्धीने वागत असतील तर सर्वसामान्य शेतकर्यांचे काय हाल होत असतील हे यावरूनच दिसून येते. एक शेतकरी एक डी.पी. या योजनेचे पुर्ण अनामत रक्कम भरून मी माझ्या शेतामध्ये डी.पी.घेतला होता. त्याचे मेंन्टनस महावितरण कंपनीकडे असून मी वारंवार लेखी व तोंडी दुरूस्तीची मागणी करूनही दखल घेतली नाही. त्यामुळे माझ्या रब्बी पिकाचे चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. उलट मला आर्थिक पैशाची मागणी पुर्ण न केल्यामुळे माझ्या शेतातील डी.पी.चे काम झाले नाही त्यामुळे मी आता उर्जामंत्र्याकडे दाद मागीतली आहे.
– नामदेव गायके, सेवानिवृत कर्मचारी महावितरण अंबाजोगाई
डी.पी.न दुरूस्त केल्यामुळे चार लाख रूपयांचे नुकसान
वरील योजनेतील स्वतंत्र माझ्या शेतासाठी हा डी.पी.अनामत रक्कम भरून घेतला होता. संबंधीत डी.पी.चे व विजेच्या खाबांचे परतीच्या पावसाने नुकसान झाल्यामुळे माझे पाच एक्करातील पिकाचे चार लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. वीज बिल वेळेवर नाही भरले तर वितरण कंपनी विज जोडणी कट करतात. मागील सहा महिन्यापासुन ही विज दुरूस्त न केल्यामुळे याला जबाबदार कोण?
– नरसिंग गायके, शेतकरी वानटाकळी.