केजच्या गटविकास अधिकारीपदी विठ्ठल नागरगोजे

केज /प्रतिनिधी:
केज येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार विठ्ठल नागरगोजे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला असून पहिल्या दिवशी सर्व विभागाचा आढावा घेतला.
केज येथील पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदाचा पदभार धारूरचे गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांनी पदभार घेतल्याने काही दिवसात ते वैद्यकीय रजेवर गेले. त्यामुळे येथील पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी २२ जून रोजी दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार नागरगोजे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लोकप्रतिनिधी, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
पारदर्शक काम करणार
पंचातय समिती प्रशासन गतीमान करण्यासह पारदर्शकपणे कामे केली जातील. आढावा बैठक घेऊन यंत्रणेला तशा सूचना देखील दिल्या आहेत.– विठ्ठल नागरगोजे, प्रभारी गटविकास अधिकारी, केज