अंबाजोगाई
डॉ. सुदाम मुंडे यांना चार वर्षाची सक्तमजुरी

अंबाजोगाई: न्यायालयाने घालून दिलेल्या अटीचे उल्लंघन करून परळी येथील डॉ. सुदाम मुंडे यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू ठेवला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी डॉ. मुंडे यांच्या हॉस्पिटल वर छापा मारला होता. यावेळी डॉ. अशोक थोरात यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून सुदाम मुंडे यांनी शासकीय कामात अडथळा आणला होता.
या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याची सुनावणी होऊन अप्पर न्यायमूर्ती व्हि. के. मांडे यांनी कलम ३५३ अन्वये डॉ. सुदाम मुंडे यांना चार वर्षाची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. सदर प्रकरणात सरकार तर्फे ॲङ अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली ॲङ नितीन पुसदेकर व कोर्ट पैरवी गोविंद कदम यांनी सहकार्य केले.