केज मधील सराईत गुंड धास्तावले, एका सराईत गुन्हेगाराची झोपडपट्टी दादा कायद्या अतर्गत हर्सूल कारागृहात रवानगी
सपोनि वाघमोडे यांची धडक कारवाई

गौतम बचुटे/केज:- केज पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी कठोर कार्यवाही करीत एका सराईत गुंडांवर झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत कार्यवाही करीत त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या आदेशाने व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनानखाली पोलीस स्टेशन यांनी प्रभारी सहाययक पोलीस निरिक्षक शंकर वाघमोडे यांनी केज शहरातील सराईत गुन्हेगार आवेज उर्फ आवडया खाजा शेख वय १९ वर्ष रा.कोकाचपिर केज या सराईत गुन्हेगारवर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती आणि वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम अन्वये कायद्या अंतर्गत बंदोवस्त करण्यासाठी मा .जिल्हाधिकारी बीड येथे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. सदर प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यास ताब्यात घेण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस अमलदार अशोक नामदास, अनिल मंदे, अशोक गवळी यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आलेली आहे. सदर कारवाई मध्ये सहाय्यक.पोलीस निरिक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्दे, अशोक नामदास, अनिल मंदे, अशोक गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
आवेज उर्फ आवड्या आरोपीने हा शहरातील मोटार सायकल चोरी इतर चोऱ्या, दादागिरी, गुंडागर्दी करण्याच्या सवयीचा असल्याने केज शहरातील नागरिक त्रस्त झाले होते..वेळोवेळी त्याचेवर कारवाई करून सुद्धा काही फरक पडत नव्हता. या कारवाईमुळे चांगलाच परिणाम होईल. त्यामुळे जनतेमध्ये आनंदाची स्वर निघत असून अशा प्रकारचे सराईत गुन्हेगार धास्तावले आहेत. या कार्यवाईमुळे तसा पोलीस प्रशासनावर लोकांचा विश्वास असल्याचा स्वर निघत आहे.