केज

पाणी असतानाही पाणी देण्यास टाळाटाळ; साळेगावचे नागरिक करणार उपोषण

गौतम बचुटे/केज :- पाणीपुरवठा विहीर तुडुंब भरलेली असताना काही भागात पाणीच येत नसल्याने साळेगाव ता केज येथील नागरिक उपोषणाला बसणार आहेत.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील बस स्टँडच्या परिसरातील भागात नागरिकांना पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्राम पंचायत कार्यालयाला निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. १३ फेब्रुवारी पर्यंत जर पाणी पुरवठा झाला नाही; तर दि. १३ फेब्रुवारी रोजी साळेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात आमरण उपोषण करण्यात येईल. निवेदनावर बालासाहेब बचुटे, लक्ष्मण लांडगे, सचिन राऊत, बलभीम बचुटे, जय जोगदंड, अक्षय वरपे, धनराज पारखे, विकास राऊत, बाबुराव टोपे, दत्ता गाढवे, दशरथ राऊत, संजय घाटूळे, विष्णू गाढवे, दिनेश सरवदे, सलीम शेख, दत्ता वरपे, मेजर शिवाजी इंगळे, अशोक टोपे, दत्ता गायकवाड, बाबुमियाँ शेख, रत्नाकर राऊत यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती मा. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.

दरम्यान महामार्गावर ५४८-सी चे  ओएफसी केबलचे काम करणाऱ्या गुत्तेदार यांनी काम करताना नादुरुस्त झालेली नळयोजना दुरुस्त करण्यासाठी पाईप व साहित्य आणले होते. परंतु ते साहित्य गायब झाल्याची चर्चा आहे.

साळेगाव ग्राम पंचायत विकास आराखडा २०२१-२२ मध्ये ऑनलाइन करताना अनावधानाने नळ योजना दुरुस्तीवर अंदाजात पत्रकात बजेट न टाकल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आराखड्यात बदल करू. – ओम चोपणे ( ग्रामसेवक, साळेगाव)

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!