अंबाजोगाईकृषी

शेतकऱ्यांच्या नावाने आलेला पीक विमा सत्ताधार्यांच्या घशात गेला की काय ?

  • प्रवक्ते राम कुलकर्णींचा सवाल

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
कोरोना महामारीत शेतकरी हा संकटात सापडलेला असतांना मागच्या वर्षाचा पीक विमा आद्याप ही वाटप झालेला नाही.केंद्र सरकारने विमा कंपनीला त्यांचा सहभाग निधी देवून सुद्धा कंपनी तांत्रीक कारणे सांगून विमा वाटप करत नसल्याने शेतकरी संतापलेला आहे.दरम्यान मराठवाड्यात या प्रश्नावर एकही मंत्री तोंड उघडायला तयार नसून शेतकऱ्यांच्या नावाने आलेला पीक विमा सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी हडप केला की काय ? अशी शंका उपस्थित करीत भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी लवकर पीक विमा वाटप झाला नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,मागच्या वर्षीचा विमा शेतकर्यांना अद्याप ही वाटप झालेला नाही.मराठवाड्यात कोट्यावधी रूपयांचा विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे.शिवाय पावसाळा संपत आलेला असतांना गतवर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली होती.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही.सर्व जिल्ह्यात पिक आणेवारी सुद्धा ५०% आत राहिली.शेतकऱ्यांनी सावकारा कडून कर्ज घेतले तर आनेकांनी संसारातले दागदागिने मोडून पीक विमा भरला होता.केंद्र तथा राज्य सरकारने विमा कंपन्यांना त्यांचा सहभाग निधी सुद्धा देवून टाकला.मात्र विमा कंपन्यानी शेतकर्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरले असून तांत्रिक कारणे दाखवून विमा चक्क वाटप केला नाही.राज्यात देवेन्द्र फडणवीस यांचे सरकार असतांना कागदपत्र ग्राह्य धरून सतत पाच वर्षे विमा मुबलक प्रमाणात वाटप केला.एवढेच काय शेतकर्यांना एकदा ही आंदोलन करण्याची वेळ आली नाही.यंदा ठाकरे सरकारने मात्र या प्रश्नावर शेतकरी विरोधी भुमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.शेतकर्यांना विमा न वाटप करण्यामागे सत्ताधार्यांचा हात असून विमा कंपन्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या नावाने आलेला पीक विमा सत्ताधार्यांच्या घशात गेला की काय अशी शंका उपस्थित करून कुलकर्णी म्हणाले की,केंद्र तथा राज्य सरकारने विमा कंपन्यांना त्यांचा सहभाग निधी देवून सुद्धा टाकला मग पीक विम्याचा पैसा गेला कुठे ? असा सवाल त्यांनी केला कागदोपत्री ग्राह्य धरून शेतकर्यांना विमा का वाटप करत नाहीत ?मराठवाडयातील शेतकरी अडचणीत असतांना त्यांना विमा मिळत नाही.मग,या विभागातील एकही मंत्री या प्रश्नावर तोंड का उघडत नाही.एकही मंत्री या प्रश्नावर बोलायला तयार नसून सत्ताधारी,सर्व लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प का आहेत ? असा सवाल कुलकर्णी यांनी विचारला आहे.ठाकरे सरकारच्या काळात शेतकर्यांच्या नावाने आलेल्या विम्याच्या पैशाचे काय झाले असेल कारण,या बाबत विमा कंपनी देखिल काहीच बोलत नाही याचे आश्चर्य वाटते असे भाजपा पक्ष प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणाले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!