क्रीडा

केन विल्यम्सन इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून बाहेर

लंडन: न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन हाताच्या उजव्या कोपऱ्याच्या त्रासामुळे एजबेस्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या व अखेरच्या कसोटीतून बाहेर झाला. विल्यम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करेल. मात्र, ब्लॅक कॅप्सला विश्वास आहे की, तो १८ जूनपासून भारताविरुद्ध सुरू होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यास तंदुरुस्त होईल. जगातील आघाडीच्या कसोटी फलंदाजाने बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी बुधवारी कसाेटीतून आपले नाव मागे घेतले. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी म्हटले की, ‘केनसाठी कसोटी न खेळण्याचा निर्णय घेणे सोपे नाही. मात्र, त्याचा निर्णय योग्य आहे. साउदम्प्टनमध्ये आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. तो १८ जूनपर्यंत तंदुरुस्त होईल, असा विश्वास वाटतो.’ विल्यम्सनला विश्रांती आणि रिहॅब करण्याची गरज आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!