परळी

रस्त्यावर राख सांडणाऱ्या हायवा चालकांना महिलांचा चोप

परळी/ प्रतिनिधी:
राखेची वाहतूक करणाऱ्या हायवामुळे वैतागलेल्या महिलांनी शुक्रवारी ( दि. २५) सकाळी हायवा अाडवत चालकांना चोप देत स्वतःच्या अंगातील शर्ट काढायला लावत रस्त्यावर सांडलेले राख शर्टाने भरायला लावल्याचा प्रकार तालुक्यातील गोपीनाथ गड परिसरात घडला. या प्रकाराचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

परळीचा औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या वाहतुकीमुळे आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. घरात, दारात पसरलेल्या राखेने ग्रामस्थ हैराण झाले आहेत आहे. राख वाहतूक करणारे हायवा राखेवर पाणी मारत नाहीत आणि झाकूनही नेत नाहीत त्यामुळे परळी तेलगाव रोडवर नुसती राख दिसून येते. येथील गोपीनाथगडावर देखील अशीच राख पडत असल्याने शुक्रवारी सकाळीच महिला आक्रमक झाल्या. त्यांनी या ठिकाणावर ये जा करणारे सर्व हायवा अडवून त्यातील चालकांना चोप दिला आणि त्यांना अंगातील शर्ट काढायला लावून रस्त्यावर सांडलेली राख भरायली लावली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!