क्राईम डायरीमाजलगाव

तक्रार का करतात म्हणून मारहाण

माजलगाव/ प्रतिनिधी
आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी का गेलात असे कारण काढून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना शनिवारी तालुक्यातील मंजरथ येथे घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चारजणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंजरथ येथील मीना तुकाराम चोरमले यांना तुझा पती आमच्या विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी का गेला असे कारण काढून त्यांच्या घरावर दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडल्या व घरात अनाधिकृत प्रवेश करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मिना चोरमले यांच्या फिर्यादीवरून प्रकाश भगीरथ कांबळे, रंगनाथ बाबू चुंबळे, संजय चिंतामण चुंबळे, ज्ञानेश्वर पंचराम चुंबळे (सर्व रा. मंजरथ ) यांच्यावर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड हे करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!