क्राईम डायरीवडवणी

महिलेस चाबकाने मारहाण; चौघांवर गुन्हा

वडवणी/प्रतिनिधीः

शेतीच्या वादातून एका महिलेस चाबकाने मारहाण केल्याची घटना १९ रोजी तालुक्यातील परडी माटेगाव येथे घडली. यावरुन चौघांवर वडवणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. रुक्मिणी व्यंकटी भोजणे (४५) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार १९ रोजी त्या परडी माटेगाव शिवारातील शेतात कापूस लागवडीसाठी गेल्या होत्या. यावेळी ही शेती आमची आहे, तुम्ही वहिती करु नका, असे म्हणत त्यांना चाबकाने मारहाण केली. त्यांचे पती व दोन मुले सोडवासोडव करण्यसाठी आले तेव्हा त्यांनाही चापटा व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बाबासाहेब बापूराव भोजणे, दत्ता बाबासाहेब भोजणे, शर्मिला बाबासाहेब भोजणे, सरस्वती बाबासाहेब भोजणे यांच्यावर वडवणी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!