क्राईम डायरीगेवराई

बेशुद्ध अवस्थेत आढळून आली विवाहित महिला

गेवराई/प्रतिनिधी

तालूक़्यातील कुंभे जळगाव येथे माहेरी आलेली व दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली एक २५ वर्षीय विवाहित महिला शुक्रवारी ( दि.११) सकाळी तालुक्यातील कवडगाव शिवारात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे. घटनास्थळी चकलांबा पोलिसांनी दाखल होत बेशुद्ध महिलेस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना अरविंद राठोड (वय २५ वर्षे) असे त्या महिलेचे नाव आहे. ही महिला तिच्या आईच्या घरी राहण्यासाठी आली होती.दरम्यान ६ जून रोजी माहेरून गायब झाल्यानंतर त्यांच्या आईने ८ जून रोजी चकलांबा पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल केली आहे. चकलांबा ठाण्याचे पोलिस शोध घेत असताना शुक्रवारी सकाळी वडगाव शिवारातील एका ठिकाणी सदरील महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान हा प्रकार कशामुळे झाला. याचा अधिक तपास चकलांबा पोलिस करीत असून सदरील महिला शुद्धीवर आल्यावर नेमकी माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!