केजक्राईम डायरी
विनयभंग करून पीडितेसह पतीला मारहाण

केज/प्रतिनिधी
२५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून विनयभंग करत पीडित महिलेस व तिच्या पतीस मारहाण केल्याची घटना केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २५ वर्षीय महिला १२ जून रोजी सकाळी ९ वाजता बाथरूमला निघाली होती. ती एकटीच जात असल्याची संधी साधून गुरुलिंग बारिकराव दराडे या तरुणाने तिचा पाठलाग करत तिला गाठले. त्याने तिचा विनयभंग केला. पीडितेने विरोध केल्याने तिला व तिच्या पतीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिलीए अशी फिर्याद पीडितेने दिल्यावरून गुरुलिंग दराडेविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल केला. तपास पोलिस नाईक रुक्मिण पाचपिंडे करत आहेत.