महिलेस बेदम मारहाण करत विनयभंग, चाैघांवर गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी:
शेतात कापूस लागवड करत असलेल्या महिलेस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत तिचा विनयभंग (Women Molested) केला. ही घटना केज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. याप्रकरणी केज पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल केला.
केज तालुक्यातील ४० वर्षीय महिला २३ जूनला दुपारी २.३० वाजेच्या सुमारास तिच्या शेतात कपाशीची लागवड करत हाेती. दरम्यान, शहाजी वैजनाथ आंधळे, रामा वैजनाथ आंधळे, मारुती आघाव, कांचन शहाजी आंधळे (सर्व रा. कोल्हेवाडी ता. केज) यांनी येऊन ‘तू आमच्यावर रोज दहा केस कर, आम्हाला काहीच फरक पडत नाही,’ असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर रामा आंधळेने तू नवऱ्याजवळ नांदत नाहीस असे म्हणत वाईट हेतूने साडी ओढत विनयभंग केला. तर मारुती आंधळेने हाताच्या दंडाला चावा घेत जिवे मारण्याची धमकी दिली, अशी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला.