क्राईम डायरीधारुर

साप चावल्याने विवाहीतेचा मृत्यू

धारूर /प्रतिनिधी:
आठ दिवसापूर्वी घरात असताना साप चावल्याने उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( दि. १८ ) शहरातील जाधव गल्लीत घडली. प्रिया गणेश माने (वय 25 वर्षे) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांच्यावर अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते.

धारुर तालुक्यातील मूळ जैतापूर येथील रहिवासी असणारे व सध्या धारूर शहरात कजबा विभागात जाधव गल्लीत राहणारी विवाहिता प्रिया गणेश माने यांना आठ दिवसांपूर्वी घरात साप चावला होता. त्यांच्यावर सुरुवातीला धारूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. मयत प्रिया माने यांना अधिरा नावाची दोन वर्षाची कन्या हे आईचा साप चावल्याने मृत्यू झाल्याने चिमुकली आईच्या प्रेमाला पोरकी झाली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!