माजलगाव

माजलगावच्या बायपास रस्त्याचे ७ वर्षांपासून भिजत घोंगडे!

माजलगाव /प्रतिनिधी
शहराबाहेरून संभाजी चौक ते मौलाना आझाद चौक असा बायपास रस्ता सुमारे पंधरा वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. शहराला वळसा घालून जाणारा हा रस्ता अरुंद होता परंतु कल्याण – विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावरून निर्मित झाल्यानंतर या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. परंतु दोन वळणाच्या ठिकाणी रस्त्यासाठी जमीन संपादनाच्या गोंधळात रस्त्याचे काम राखडले. संपादन प्रक्रिया पूर्ण होऊनही काम न झाल्यामुळे या ठिकाणी होत असलेल्या अपघातांमुळे रस्ता मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे.

माजलगाव शहरासाठी बायपास रस्ता हा माजलगाव शहरातून होत असलेल्या वाहतुकीमुळे होत असलेल्या कोंडीवर चांगला उपाय ठरला. संभाजी चौक ते मौलाना आझाद चौक असा जवळपास दोन किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्यावर रुद्रवार यांच्या जमिनीच्या संपदनाच्या पैशांवरून वाद उपस्थित होता तो संपुष्टात आलेला आहे. सदर जागा आणि न्यायालयाच्या पुढे असलेल्या बजाज यांच्या जागेतील वळण रस्ता आशा २ ठिकाणी महामार्गाचे काम कंपनीने अडकवून ठेवले आहे. या मुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. थोडेच काम असताना देखील कंपनी याकडे लक्ष देत नाही. खराब रस्त्याने या ठिकाणी अपघातात ७ ते ८ जणांना जीव गमवावा लागला. गढी ते मानवत पर्यंतचे काम कंपनीने केलेे.रस्त्याच्या देखभालीतही कमी नाही मग या २ ठिकाणीच दूर्लक्ष का? असा सवाल नागरिकांमधून आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!