केज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येडेश्वरीच्या डिस्टिलरी प्रकल्पाचे ८ एप्रिल रोजी उदघाटन

ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि ना. धनंजय मुंडे यांच्या विशेष उपस्थितीत होणार उदघाटन

गौतम बचुटे/केज :- शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांतीची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या येडेश्वरी शुगर कारखाना सारणी (आं.) च्या आसवानी (डिस्टीलरी) विस्तारीत ६० किलो लिटर प्रतिदिन प्रकल्पाचे उद्घघाटन दि. ८ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. आजित दादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती येडेश्वरी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन बनजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी साखर कारखान्याच्या विस्तारीत आसवानी (डिस्टीलरी) प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारित प्रकाल्पाद्वारे आता दिवसाला ६० किलो लिटर आसवानी निर्मिती होणार आहे. त्याचे उदघाटन दि. ८ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते होणार असून महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. या उदघाटन सोहळ्यासाठी ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले आणि ह.भ.प महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचा कृपा आशीर्वाद असणार आहे. तसेच आ. प्रकाश दादा सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षिरसागर, विधान परिषद सदस्य आ. संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांची प्रमुख उपस्थित असणार आहेत.
केज तालुक्यातील आणि परिसरातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन येडेश्वरी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
या निमित्त त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला जेष्ठ राष्ट्रवादीचे नेते हाजी नवाब मामु, नगरसेवक मुस्तफा कुरेशी, जनार्धन सोनवणे, चंदू चौरे आणि मुकुंद कणसे हे उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!