क्राईम डायरीवडवणी
शेतीच्या वादातून तरुणास मारहाण

वडवणी/प्रतिनिध:
शेतीच्या वादातून परडी माटेगाव येथे तरुणास मारहाण ( Youth beaten) केल्याची घटना १९ रोजी घडली.यावरुन चौघांवर गुन्हा नोंद झाला. दत्तात्रय बाबासाहेब भोजणे (३५) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, १९ रोजी ते शेतात सोयाबीन पेरणी करण्यासाठी गेले होते. यावेळी व्यंकटी बापूराव भोजणे याने आमची जमीन वहिती करायची नाही, असे म्हणत दत्तात्रय व त्यांचे वडील बाबासाहेब यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. इंद्रजित व्यंकटी भोजणे याने बाबासाहेब यांना काठीने मारहाण केली तर रुक्मिण व्यंकटी भोजणे हिने दगड डोक्यात मारुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. वडवणी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.