क्राईम डायरीधारुर

आडस तरूणाची आत्महत्या

धारुर / प्रतिनिधी :

तालुक्यातील आडस येथील एका ३० वर्षीय तरुणाने रहात्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी ( दि. २० ) दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली.

दत्ता आश्रुबा लगसकर (वय ३० वर्ष ) रा. आडस असे मयत तरुणाचे नाव असून त्यांने आई-वडील सह घरातील सर्वजण शेतात गेल्यानंतर घरी कोणीच नसल्याचे पाहून पत्र्याच्या आडूला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वडील काही कामानिमित्त घरी आले असता घटना उघडकीस आली. पोलिसांना खबर दिली असता पो.कॉ. कातखडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात पाठविला असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!