अंबाजोगाई: आपेगाव येथे नवीन हार्वेस्टरचे चेअरमन रमेशराव आडसकर आणि बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते पूजन संपन्नअंबाजोगाई: तालुक्यातील आपेगाव येथील प्रगतशील शेतकरी उमेश तट यांनी खरेदी केलेल्या नवीन ऊस तोडणी यंत्राचे (हार्वेस्टर) पूजन अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजलगाव मतदारसंघाचे नेते रमेशराव आडसकर आणि नॅचरल शुगर साखर कारखाना (रांजणी) चे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
कृषी क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर दिवसेंदिवस वाढत असून ऊस तोडणी आणि शेती कामांना मोठी गती मिळत आहे. मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर आपेगाव येथील उमेश तट यांनी लाखो रुपये खर्च करून अत्याधुनिक असे नवीन हार्वेस्टर खरेदी केले आहे. त्याच्या शुभारंभाप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले.यावेळी चेअरमन रमेशराव आडसकर तसेच चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी तट कुटुंबीयांना त्यांच्या या नवीन उपक्रमाबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैसा तिन्ही वाचतो. हार्वेस्टरमुळे एका दिवसात 20 ते 25 एकरापर्यंत ऊस तोडणी करणे शक्य होणार असून परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.या पूजन सोहळ्याप्रसंगी उत्तमअबा तट, ॲड. बाळासाहेब इंगळे, जयजित (बापू) शिंदे, नरेंद्र तट, बालाजी तट, पिंटू गुरुजी, रवीअप्पा तट यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सध्या ऊस हंगाम सुरू होत असून या हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. कमी वेळात जास्त काम पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. यावेळी उपस्थित सर्वांनी उमेश तट यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक केले. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, शेतीमध्ये यांत्रिकीकरण काळाची गरज आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येतात. या हार्वेस्टरमुळे आपेगावसह अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना लाभ होईल.
अधिक माहितीसाठी बीड न्युज एक्सप्रेस वाचत रहा.
