विश्वजीत गंडले/बर्दापूर:अंबाजोगाई तालुक्यातील उजणी येथील महावितरणच्या सबस्टेशनला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील तब्बल २ लाख रुपये किमतीची तांब्याची कॉईल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या सुरक्षित आवारातून इतक्या मोठ्या प्रमाणावर तांब्याची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, […]
