अंबाजोगाई (प्रतिनिधी)

अंबाजोगाई नगरपरिषद कार्यालय हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. मात्र नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच आणि रस्त्यावरच मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या चार चाकी गाड्या बेकायदेशीरपणे लावल्या जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

नगरपरिषदेच्या आवारात ड्रायव्हिंग स्कूलच्या आणि इतर खाजगी चार चाकी गाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे पादचाऱ्यांना, रुग्णांना आणि शाळकरी मुलांना जाण्या-येण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. सदरील परिसरात द ज्यूस फार्म, रॉयल केक्स अशा दुकानासमोरच गाड्या लावल्याने व्यापाऱ्यांनाही याचा त्रास होत आहे. हा रस्ता बस स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. असे असतानाही नगरपरिषद प्रशासन आणि वाहतूक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नगरपरिषदेने तात्काळ या बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *