विश्वजीत गंडले/घाटनांदुर: वडील ऑटो रिक्षा चालवत असल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असतानाही, कोणतेही खाजगी ट्युशन किंवा कोचिंग क्लास न लावता केवळ कॉलेजच्या शिकवणीवर अभ्यास करत मूळची अंबाजोगाई तालुक्यातील चोपनवाडी येथील स्नेहा रमाकांत बडे हिने मोठे यश संपादन केले आहे. तिचा कागल, जि. कोल्हापूर येथे BAMS अभ्यासक्रमासाठी नंबर लागला आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळा, […]
