घटस्थापने नंतर देवीच्या दर्शनासाठी झाली गर्दी

ङि सदानंद/अंबाजोगाई-: श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास रविवारी सकाळी १०:०० वाजता मंदिरात घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरगे (सोनवणे), हरिश्चंद्र सोनवणे यांनी विधीवत महापूजा केली. महापूजेनंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत श्री.योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. रविवारपासून मंदिर परिसरात कीर्तन, प्रवचन, भजन उपक्रम सुरू झाले आहेत. आज झालेल्या महापूजेसाठी योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे, उपाध्यक्ष अक्षय मुंदडा, सचिव गिरधारीलाल भराडिया, सहसचिव कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष पूजा राम कुलकर्णी, उत्सव प्रमुख उल्हास पांडे, विश्वस्त आ. नमिता मुंदडा, राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे, श्रीराम देशपांडे, विश्वस्त तथा मुख्य पुजारी सारंग पुजारी, गौरी जोशी, संजय भोसले, हंसराज देशमुख, शिरीष पांडे, प्रवीण दामा, राजन पुजारी यांच्यासह पुरोहित, मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. घटस्थापनेनंतर श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांची गर्दी झाली होती. महोत्सवात भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

पहिल्याच दिवशी दोन तासात दर्शन

घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी महिला व भाविकांनी गर्दी केली असली तरी दोन तासात दर्शन होऊ लागले आहे. सोमवार पासून भाविकांची गर्दी वाढणार आहे.

D. Sadanand is a new rural correspondent from Ambajogai taluka, Beed district. He recently joined Beed News Express to cover rural areas of Ambajogai, focusing on village news, local events, and social...