जयकिसान विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

आपेगाव/ प्रतिनिधी:

महापुरुषांच्या जयंत्या केवळ औपचारिकपणे साजरी न करता त्यांच्या थोर विचारांचे चिंतन करणे आणि ते विचार प्रत्यक्ष जीवनात व कृतीत आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे विचार संस्थेचे सचिव प्रा. जयजीत बापू शिंदे यांनी मांडले.

येथील जयकिसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व विचार प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. जयजीत शिंदे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक एम. व्ही. कांबळे उपस्थित होते. पुढे बोलतांना प्रा. जयजीत बापू शिंदे म्हणाले की,   मुली ज्याप्रमाणे अभ्यासात व वक्तृत्वात पुढे असतात, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपले मत ठामपणे मांडण्याचा सराव करावा, असे महत्त्वपूर्ण आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण व प्रभावी विचार मांडले. शिक्षक विकास तपकिरे यांनी नी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणानंतर परीक्षकांनी लहान व मोठ्या गटातून गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविले. शिक्षक ए. एस. पवार व श्रीमती एस. एन. कांबळे यांनी परीक्षण केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जे. पी. काकडे यांनी केले तर सर्वांचे आभार एस. एन. घुले यांनी मानले.

भाषण स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी:

लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी):

आदिती धनंजय तट, संस्कृती गोगावकर, भार्गवी रणजित शिंदे, स्नेहा कांबळे, वैष्णवी केंद्रे, सार्थक रवींद्र साळुंके, अरमान शेख, सुहानी अमोल गोयकर, वेदिका विष्णू शितोळे, शिवानी व्यंकटी कुरे, अनुष्का तट, श्रुती श्रीकांत तट, अनुजा शिंदे, ज्ञानेश्वर श्रीनिवास तट, शिवप्रताप शिंदे, पंकज वाघमारे, वैष्णवी जोगदंड आणि योगेश्वरी वसंत पांचाळ.

मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी):

कन्हैया शितोळे, अंजली भोसले, रोहिणी सचिन तट, मुस्कान इस्माईल शेख, अनन्या पांढरे, रिता पंडित वाकळे, श्रेया गोयकर, आदित्य शिंदे, रोहण तट, राजवीर शिंदे, अरमान शेख, अमृता शितोळे, तृप्ती शिंदे, अंकिता तट, संस्कृती शिंदे आणि सिद्धी तट.

  पारितोषिक विजेते विद्यार्थी

लहान गट (इयत्ता ५ वी ते ७ वी):

• प्रथम : कु. योगेश्वरी वसंत पांचाळ ( ७ वी) • द्वितीय : कु. सुहानी अमोल गोयकर ( ६ वी) • तृतीय: कु. वेदिका विष्णू शितोळे ( ६ वी)

मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी):

• प्रथम : कु. मुस्कान इस्माईल शेख ( ९ वी) • द्वितीय : कु. रोहिणी सचिन तट (९ वी) • तृतीय : कु. रिता पंडित वाकळे (९ वी)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *