अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यातील चनई ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. ग्रामपंचायत कर वसुली आणि फेरफार नोंदीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट केली जात असून, दोषी ग्रामसेवक आणि उपसरपंचावर तातडीने गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई शाखेच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना […]
