घाटनांदुर/प्रतिनिधी: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील रहिवासी भानुदास गोदाम यांचे शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) सकाळी दुःखद निधन झाले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. परळी वैजनाथ येथील दिवंगत रिपाई शहर अध्यक्ष बाळकृष्ण रोडे यांचे ते सासरे होत.
