अंबाजोगाई (बीएन वृत्तसेवा):अंबाजोगाई शहरात गेल्या काही दिवसांपासून सीएनजी इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. दिवाळीनिमित्त पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकहून गावी आलेले चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. यातील बहुतांश जणांकडे सीएनजी कार आहेत. त्यामुळे शहरातील पाण्याच्या टाकी परिसरातील एकमेव सीएनजी पंपावर तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. पेट्रोल-डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त आणि जास्त […]
