डि. वालेकर / अंबाजोगाई: विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही शाळा, पालक आणि वाहन चालकांची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत आणणे आणि घरी पोहोचविणे यासाठी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप यांनी केले.

योगेश्वरी नूतन विद्यालयात शालेय परिवहन समिती आणि सखी सावित्री समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत वाहन चालकांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. जगताप म्हणाले की, वाहन चालविताना मद्यप्राशन करू नये, कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये तसेच मोबाईलचा वापर टाळावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वाहन चालवावे. ‘मुलगा सुरक्षितपणे पोहोचला पाहिजे’, ही भावना प्रत्येक चालकाने मनात ठेवावी.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक निलेश पाटील यांनी वाहनांच्या कागदपत्रांबाबत तसेच सुरक्षित वाहतुकीच्या नियमांबाबत सविस्तर माहिती दिली. वाहन चालकाकडे वैध परवाना असणे आवश्यक आहे. वाहनाचा विमा अद्ययावत असावा. वाहनाच्या आसन क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसवू नये. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवावा, असे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी नमूद केले. वाहनातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती शाळेला देणे गरजेचे आहे.

आई-वडिलांनंतर पालक आपल्या काळजाच्या तुकड्यांना चालकांच्या स्वाधीन करतात. त्यामुळे चालकांनी अत्यंत जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने वागले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.स्कूल बस व ऑटो चालकांसाठी स्वतंत्र कार्यशाळा घेऊन सुरक्षित वाहतुकीसंदर्भातील कायदे, नियम आणि नियमावली याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक लंकेश वैद्य गुरुजी यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा पाठक, नगरसेविका सुचिता देशपांडे, पालक सौ. धाट तसेच शालेय परिवहन समिती व सखी सावित्री समितीचे सदस्य, शिक्षक आणि वाहन चालक उपस्थित होते.टाकून झाली की लिंक पाठवा, मी चेक करून सांगतो By वालं बरोबर आलंय का.

D. Sadanand is a new rural correspondent from Ambajogai taluka, Beed district. He recently joined Beed News Express to cover rural areas of Ambajogai, focusing on village news, local events, and social...