गौतम बचुटे / केज :- केज येथे पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी मोहीम राबवली. यामुळे वाहन चालकांची एकच धांदल उडाली.

गुरुवारी दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके आणि सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड-केज रोडवर, पोलीस ठाण्यासमोर ही सरप्राईज नाकाबंदी करण्यात आली. यावेळी फॅन्सी नंबर प्लेट, HSRP नंबर प्लेट, आर.सी. बुक, वाहन परवाना, प्रदूषण प्रमाणपत्र, मोटार सायकलचे सायलेन्सर, तसेच चालक आणि शेजारी बसलेल्या प्रवाशाने सीट बेल्ट लावला आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली.

या पथकात स्वतः पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक असद शेख, पोलीस उपनिरीक्षक रमेश सानप, वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि पोलीस अंमलदार हजर होते.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...