गौतम बचुटे/केज: केज तहसीलच्या आवारात एका शेतकऱ्याकडून आठ हजार रु. ची लाच स्वीकारताना उमरी सज्जाचे ग्राममहसूल अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडले आहेत.

केज तालुक्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या जमिनीचा फेरफार नोंद घेण्यासाठी अर्ज केला होता. यासाठी उमरी सज्जाचे ग्राममहसूल अधिकारी परमेश्वर फलके यांनी शेतकऱ्याकडे पैशांची मागणी केली होती. तक्रारदार शेतकऱ्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीड येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला होता.लाचलुचपत पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दि. ८ ऑक्टोबर रोजी केज तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. तक्रारदार शेतकऱ्याकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लाच स्वीकारीत असताना ग्राममहसूल अधिकारी परमेश्वर फलके यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, अनिल शेळके, अविनाश गवळी, पांडुरंग काचंगुंडे तसेच चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...