गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील उमरी सज्जाचे तलाठी परमेश्वर फलके यांना 8 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी दुपारी 2 वाजता केज तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले. या कारवाईत “बाबा, मी गावाकडून यायला निघालो…” हा कोडवर्ड निर्णायक ठरला. केज तालुक्यातील उमरी येथील शेतकरी पुरुषोत्तम यादव यांनी आपल्या मुलांना वाटणी पत्राद्वारे 34 गुंठे जमीन दिली […]

