गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील उमरी सज्जाचे तलाठी परमेश्वर फलके यांना 8 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी दुपारी 2 वाजता केज तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले. या कारवाईत “बाबा, मी गावाकडून यायला निघालो…” हा कोडवर्ड निर्णायक ठरला.

केज तालुक्यातील उमरी येथील शेतकरी पुरुषोत्तम यादव यांनी आपल्या मुलांना वाटणी पत्राद्वारे 34 गुंठे जमीन दिली होती. या जमिनीची फेरफार नोंद 7/12 वर घेण्यासाठी तलाठी फलके यांनी 8 हजार रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने अक्षय यादव यांनी बीड ACB कडे तक्रार दिली. ACB पथकाने केज तहसीलच्या मागील दालनात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे अक्षय यांनी पैसे दिल्यानंतर मोबाईलवरून कोडवर्ड उच्चारला. इशारा मिळताच ACB पथकाने तलाठ्याला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 7(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...