गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील टाकळी येथे अज्ञातांनी काढणी करून ठेवलेल्या चार शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग (Fire Incident) लावल्याने सोयाबीन जळून भस्मसात होऊन १४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील पाच दिवसातील ही सहावी घटना असून या आगीत आतापर्यंत सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या बाबतची सविस्तर माहिती (Details) अशी की, केज तालुक्यातील टाकळी येथील शेतकऱ्यांच्या कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लावण्याचा सिलसिला पाचव्या दिवशीही कायम आहे. दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास शिवाजी कोंडीबा बारगजे, राजेंद्र कोंडीबा बारगजे, शंकर कोंडीबा बारगजे, दशरथ कोंडीबा बारगजे या चार शेतकऱ्यांनी कापणी करून रचून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून सोयाबीन जाळून भस्मसात केले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच शेतकरी आणि इतर शेजारी व ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने आग आटोक्यात आणण्याचे आणि सोयाबीन वाचविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. यात एकूण १४ लाख रुपयांचे नुकसान (Loss) झाले आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रारी (Complaint) दाखल केल्या आहेत.
पाच दिवसातील सहावी घटना (Sixth Incident )
पाच दिवसातील सहावी घटना (Sixth Incident )
यापूर्वी दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वाजता बाबासाहेब वैजनाथ घुले यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास गिरजाबाई बाबासाहेब घुले यांच्या गंजीला आग लागली आणि त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी चार शेतकऱ्यांच्या गंजी जळून भस्मसात झाल्या आहेत. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तो कोण असावा (Investigation)
टाकळी परिसरात सोयाबीनच्या गंजीला आग लावण्याचा हा खोडसाळपणा कोण करीत असावे, याचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. हा घातपात आहे की आणखी काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
आधीच दुष्काळात; पुन्हा संकट
यावर्षी अवर्षणामुळे (Drought) आधीच म्हणावे तसे उत्पन्न निघालेले नाही. जे काही हाती आले होते, ते सुद्धा जाळून भस्मसात झाले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड दडपणाखाली आणि मानसिक त

