अंबाजोगाई (प्रतिनिधी):
अंबाजोगाई शहरातील गांधी चौक परिसरातील एका डेंटल लॅबचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने टेबलच्या ड्रॉव्हरमधील १ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राजीव गांधी चौक जवळील निवृत्ती पार्क येथे प्रमोद भारत चिवडे (वय ३० वर्षे) यांची डेंटल लॅब आहे. दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.०० ते १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०९.०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने लॅबच्या गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने लॅबमधील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ५०० रुपये दराच्या नोटांचे दोन बंडल असलेली १ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी प्रमोद चिवडे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.

विश्वसनीय बातम्यांसाठी बीड न्यूज एक्सप्रेस वाचत रहा.