गौतम बचुटे/केज : केज-मांजरसुंबा रस्त्यावर सारणी (सांगवी) जवळ झालेल्या भीषण कार अपघातातील मृताची आणि जखमीची ओळख पटली आहे.

चाकरवाडी ता. जि. बीड येथील अशोक आश्रुबा मोरे वय (२० वर्ष) आणि पिंपळगाव (ता. केज) येथील कृष्णा रामेश्वर गायकवाड हे दोघे सोमवारी दुपारी ४.३० वा. कारने मांजरसुंब्याकडून केजकडे येत होते. सारणी-सांगवी दरम्यान वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्ड्यात जाऊन पलटी झाली.या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना नेकनूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता अशोक मोरे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, तर कृष्णा गायकवाड यांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.दरम्यान, या रोडवर सलग दुसऱ्या दिवशी अपघात घडला असून दोन दिवसात तिघांचा मृत्यू झाला आहे.

नियंत्रण सुटल्याने अपघात

सारणी-सांगवी दरम्यान वळणावर भरधाव वेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...