नेकनूरजवळ काल दोघांचा मृत्यू

गौतम बचुटे/केज:- बीड जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल नेकनूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा बळी गेल्यानंतर आज पुन्हा केज – मांजरसुंबा रोडवर अपघात झाला आहे.आज दि. १२ ऑक्टोबर, सोमवार रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास केज-मांजरसुंबा रोडवर सारणी पाटी जवळ भरधाव कार रोडवरील खड्ड्यात पडून पलटली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बीड येथील जिल्हा रुग्णालयात तर मृतदेह नेकनूर ग्रामीण दवाखान्यात हलविण्यात आला आहे.

खड्ड्यांमुळे अपघात – नागरिकांचा आरोप

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कार केजकडून मांजरसुंबाकडे जात होती. सारणी पाटीजवळ रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. या रोडची पावसामुळे चाळण झाली असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.कालची मोठी घटना – संदर्भकाल दि. ११ ऑक्टोबर रोजी बीड-नेकनूर महामार्गावर नेकनूर जवळील सारुळ पाटील वस्ती परिसरात टिप्पर ट्रक आणि पिकअपची समोरासमोर भीषण धडक झाली होती. या अपघातात अंबाजोगाईच्या दोन सख्ख्या भावांसह जागीच मृत्यू झाला होता.मृतांमध्ये हनीफ शौकत कुरेशी (वय २२) आणि आरेफ शौकत कुरेशी (वय २०, दोघे रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई) यांचा समावेश आहे. या अपघातात पिकअपमधील चार जनावरे देखील मृत्युमुखी पडली होती. हा अपघात इतका भीषण होता की पिकअपचा अक्षरशः चुराडा झाला होता.सलग दोन दिवसात जिल्ह्यात 3 जणांचा अपघाती मृत्यू आणि ४ जनावरांचा मृत्यू झाल्याने रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी नेकनूर व केज पोलीस ठाण्यात नोंद सुरू आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...