डॉ. विवेक आणि डॉ. सोनी यांचा आदर्श उपक्रम

गौतम बचुटे/केज :- लग्नानंतर अनेकजण पर्यटन स्थळी जातात, मात्र केज येथील डॉ. विवेक बचुटे आणि डॉ. सोनी यांनी विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

परभणी येथे ४ ऑक्टोबर रोजी डॉ. विवेक आणि डॉ. सोनी यांचा शुभविवाह संपन्न झाला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ५ ऑक्टोबर रोजी हे नवपरिणीत दाम्पत्य थेट पाली, ता. परळी येथील आपलं आनंदग्राम – इन्फंट इंडिया या संस्थेत दाखल झाले. तेथील लहान मुलांसोबत त्यांनी वेळ घालवला, संवाद साधला आणि प्रेमाने फराळ वाटप केला. त्यामुळे संस्थेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.आपलं आनंदग्राम ही संस्था दत्ता बारगजे आणि सौ. संध्या बारगजे यांच्या माध्यमातून चालवली जाते. यावेळी सौ. संध्या बारगजे उपस्थित होत्या.पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी गणेश माने यांची कन्या डॉ. सोनी यांचा विवाह डॉ. विवेक यांच्याशी झाला आहे. यावेळी प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आकाश बचुटे, त्यांच्या पत्नी दीक्षा उर्फ रजनी, बलभीम बचुटे, रितेश बचुटे, कु. खुशी, कु. आकांक्षा, राम शिंदे आदी कुटुंबीय उपस्थित होते.

डॉ. विवेक यांचे वडील कॅप्टन रावसाहेब बचुटे यांनी भारतीय सैन्य दलात महार रेजिमेंटमध्ये ३० वर्ष प्रदीर्घ सेवा बजावली आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिका, अंदमान निकोबार, लेह-लडाख, आसाम, गुवाहाटी, राजस्थान तसेच भारत-पाक सीमेलगत देशसेवा बजावली असून ते कॅप्टन पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...