अंबाजोगाई/बीएन प्रतिनिधी:
सायंकाळच्या सुमारास बाजारात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक नागरिकांनी जागीच रंगेहात पकडल्याची घटना रविवारच्या मोरेवाडीच्या बाजारात घडली. नागरिकांनी चोराला पकडून चांगलाच चोप दिला आणि जमिनीवर बसवून ठेवले.
घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. संशयित आरोपीजवळ चोरीचा आणखी काही माल किंवा इतर मोबाईल आहेत का, याची तपासणी नागरिकांकडून करण्यात येत होती. “अजून मोबाईल आहे का?”, “याचा दुसरा मोबाईल कुठे आहे?” अशी विचारणा करत उपस्थित नागरिकांनी त्याला जाब विचारला. दरम्यान, उपस्थित नागरिकांनी त्याला अधिक मारहाण न करता तत्काळ पोलिसांना माहिती देऊन त्यांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू केली. बाजारातील गर्दीच्या ठिकाणी अशा चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
By Beed News Express Team.
