गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील साळेगाव येथे 70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी धर्मांतर केले आणि समता, बंधुता, न्याय, सत्य, अहिंसा या पंचशील तत्त्वांसह विज्ञानवादी विचारसरणीवर आधारित मानव कल्याणकारी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. धर्मांतरापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील […]
