गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील साळेगाव येथे 70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी धर्मांतर केले आणि समता, बंधुता, न्याय, सत्य, अहिंसा या पंचशील तत्त्वांसह विज्ञानवादी विचारसरणीवर आधारित मानव कल्याणकारी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. धर्मांतरापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवले येथे धर्मांतराची घोषणा केली होती. 21 वर्ष सर्व धर्मांचा अभ्यास करून त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. या धर्मांतराचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही हिंसाचार न होता शांततेच्या मार्गाने हे धर्मांतर झाले. दि. 20 ऑक्टोबर रोजी साळेगाव ता. केज येथे 70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.

यावेळी माजी सरपंच सय्यद नूर साहेब, माजी सरपंच दैवशाला बचुटे, चेअरमन भालचंद्र गित्ते, माजी व्हा. चेअरमन लिंबाजी बचुटे, संभाजी सरवदे, ग्रामपंचायत सदस्या रेखा सरवदे, माजी ग्रामपंचायत सदस्य रतन बचुटे आणि सर्व कार्यकर्ते व बौद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

केज तालुक्यातील साळेगाव हे बौद्ध अनुयायांचे मोठे गाव म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. या कार्यक्रमामुळे परिसरातील तरुणांना बाबासाहेबांच्या विचारांची ओळख होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गावात बौद्ध विहारासाठी निधी उभारण्याचे आवाहन केले. अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक ऐक्य वाढते असे मत माजी सरपंच सय्यद नूर यांनी व्यक्त केले.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...