अंबाजोगाई / बीएन प्रतिनिधी: सामाजिक वनीकरण विभाग, बीड तथा सामाजिक वन परिक्षेत्र, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहानिमित्त कै. वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, आनंद नगर, अंबाजोगाई येथे आज मंगळवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी वन्यजीव संवर्धन व पर्यावरण जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. ए. राठोड होते. […]
