गेवराई (बीएन प्रतिनिधी):
गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथून शेतात बांधलेले ९० हजार रुपये किमतीचे दोन बैल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीपत अंतरवाला येथील शेतकरी अशोक दादाराव वाकळे (वय ५८, रा. ) यांच्या शेतातील गट क्र. ११.०१ मधून ५ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री १०:०० ते ६ ऑक्टोबर २०२६ च्या सकाळी ५:०० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने दोन बैल चोरून नेले.चोरीला गेलेल्या दोन्ही बैलांचा रंग लाल-तांबडा असून, शिंगे टोकदार, शेपूट काळा गौडा आणि पाय तांबड्या रंगाचे आहेत. एका बैलाची अंदाजे किंमत ४५,००० रुपये असून दोन्ही बैलांची एकूण किंमत ९०,००० रुपये आहे. या घटनेबाबत अशोक वाकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार जावळे करत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...