गौतम बचुटे/केज :- केजच्या गट शिक्षण कार्यालयात सुरू असलेल्या लाचखोरीचा जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पर्दाफाश केला आहे. चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे न पाठवण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि एका शिक्षकाला रंगेहात पकडण्यात आल्याने केजच्या शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाविरोधातील तक्रारीची चौकशी गट साधन केंद्रात सुरू होती. […]

