बीड (प्रतिनिधी): केज शहरातील वसंत विद्यालयाजवळील गणेश नगर भागात एका ऊसतोड मजुराचे बंद घर फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे.

शहरातील गणेश नगर येथे राहणाऱ्या जनाबाई बापू जाधव (वय 35, व्यवसाय – ऊसतोड मजुरी) या दि. 08 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2026 या कालावधीत घर बंद करून बाहेरगावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.चोरट्याने घरातील 7 हजारांचा हायर कंपनीचा फ्रिज, 12 हजारांचा एलसीडी टीव्ही, 4 हजारांचा कुलर आणि 20 हजारांचे संसारउपयोगी साहित्य व भांडी असा एकूण 43 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.या प्रकरणी जनाबाई जाधव यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात (गु.र.नं. 668/2026) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मपोह हनवते करत आहेत.

केजमध्ये घरफोडीच्या घटना वाढल्या:
गेल्या दोन महिन्यांत केज शहरात घरफोडीच्या तीन ते चार घटना घडल्या आहेत. विशेषतः ऊसतोड हंगामामुळे अनेक कुटुंबे बाहेरगावी गेली आहेत. बंद घरांना लक्ष्य करून चोरटे अशा घटना करत असल्याचे चित्र आहे. गणेश नगर, सारंगपूर रोड आणि बसस्थानक परिसरात अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे

पोलिसांचे आवहान

नागरिकांनी आपले घर बंद असताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी, मौल्यवान वस्तू बँकेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात आणि रात्रीच्या वेळी लाईट चालू ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच संशयित व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्याला कळवावे.या घटनेचा पुढील तपास केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करत आहेत. चोरट्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बंद घर असल्याचा गैरफायदा

फिर्यादी हे मूळचे केज तालुक्यातील असून सध्या त्या ऊसतोड कामासाठी बाहेरगावी गेल्या आहेत. त्यांचे घर मागील 15 दिवसांपासून बंद होते. गावातील शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तुटलेले पाहून त्यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर ते तातडीने गावी परत आले. पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...