अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या समोरील मुख्य रस्त्यावरील मोकळ्या जागेत उभी असलेल्या एका कारची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना शनिवारी (दि. 25 ) सकाळी उघडकीस आली. ही कार MH17AV8689 क्रमांकाची असून पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कारचालकाने आपली कार पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत पार्क केली होती. काही वेळानंतर अज्ञात व्यक्तीने या कारला लक्ष्य करत मोठ्या दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात कारच्या मागील बाजूची आणि बाजूच्या दरवाजाची काच पूर्णपणे फुटली आहे.दगड इतक्या जोरात मारण्यात आला होता की, काच फुटून दगड थेट गाडीच्या आत जाऊन पडला. गाडीच्या सीटवर काचांचे मोठे तुकडे पसरलेले आहेत. या घटनेमुळे कारचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, घटना घडली त्यावेळी गाडीत कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बघ्यांची गर्दी

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहरातील नागरीकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती.  या प्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध कारचे का नुसान केले आहे. या बाबत नागरीकात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.  दरम्यान हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून घडला, हा वादातून झाला की अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलिसांच्या तपासा नंतर लागणार आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती मिळाली आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...