डी. सदानंद/अंबाजोगाई:-
अंबाजोगाई टोल नाका ते सायगाव रस्त्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या टाटा पंच कारचा (क्र. MH 44 AE 3914) भीषण अपघात झाला आहे. सदरील अपघात ग्रस्त गाडी टोलनाका परिसरात लावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजता भरधाव वेगात असलेली कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून, बोनेट आणि पुढील चाकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कारमधील दोन्ही एअरबॅग वेळेवर उघडल्याने चालकाचा जीव थोडक्यात बचावला आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.
मोटरसायकलला धडक दिली?
दरम्यान, या अपघातात कारने मोटारसायकलला धडक दिली असून, मोटारसायकल स्वाराचा पाय मोडला असल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली आहे. या कारने नेमकी कशाला धडक दिली आहे हे पोलीस चौकशीनंतर समजू शकेल.
