गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील जीवाचीवाडी आणि चिखलबीड सीमेवर पुरलेल्या महिलेच्या खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Jiwachiwadi Murder ची ही घटना अशी की, शिरूर येथील माहेर असलेली ४० वर्षीय महिला शहाबाई चौरे हिचे लग्न तुकुचीवाडी येथील काबुराव चौरे यांच्याशी झाले होते. मात्र ती पतीसोबत न राहता जीवाचीवाडी येथील चौरे यांच्यासोबत पती-पत्नी सारखी राहत होती.अज्ञात व्यक्तींनी तिचा खून करून प्रेत जीवाचीवाडी आणि चिखलबीड (ता. वडवणी) हद्दीत पुरले होते. दि. ११ ऑक्टोबर रोजी जंगली प्राण्यांनी ते प्रेत उकरून बाहेर काढल्याने हा प्रकार उघडकीस आला आणि परिसरात खळबळ माजली.घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सपोनि महेश क्षीरसागर, पोहेकॉ उमेश आघाव, पोना रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाण वडवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने वडवणी पोलिसांनी प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून गुन्हा नोंद केला.या प्रकरणाचा वडवणी पोलीस, केज पोलीस आणि LCB ने समांतर तपास करून दि. १२ ऑक्टोबर रोजी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, लवकरच या खुनाचा उलगडा होणार आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...