विश्वजीत गंडले/घाटनांदुर: राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि लग्नसमारंभातील अवास्तव खर्चामुळे मेटाकुटीस आलेल्या मराठा समाजातील शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय जय भारती बहुउद्देश्यीय सेवाभावी प्रतिष्ठान, अंबाजोगाईने घेतला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने येत्या एप्रिल महिन्यात मराठा समाजातील वधू-वरांसाठी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा […]
