परळी वैजनाथ: सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या विजयकुमार गंडले प्रतिष्ठान, परळी वैजनाथच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. परळी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा अभिवादन सोहळा पार पडला.

विजयकुमार गंडले प्रतिष्ठान हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वी राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराचे वितरण अत्यंत नेत्रदीपक सोहळ्यात करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यास राज्यभरातून मान्यवरांनी हजेरी लावली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागृती करण्याचे काम प्रतिष्ठानने केले आहे.विविध पदांवर काम केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकुमार गंडले यांचे सामाजिक कार्य अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी हे प्रतिष्ठान कटिबद्ध आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा वारसा जपत समाजातील वंचित घटकांसाठी काम करणे हा या प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे.या अभिवादन प्रसंगी प्रतिष्ठानचे मुख्य प्रवर्तक तथा फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, साहित्यिक अजयकुमार गंडले, जेष्ठ रंगकर्मी प्रा. सिद्धार्थ तायडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे परळी तालुकाध्यक्ष दत्ता सावंत, विलास ताटे, प्रसिद्ध निवेदक बा. सो. कांबळे, गौतम गंडले, मयूर गंडले, गौरव गंडले यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला. बाबासाहेबांनी दिलेला समता आणि बंधुतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरूच राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विषद करताना अजयकुमार गंडले म्हणाले की, 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि नव्या युगाची सुरुवात केली. या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यापुढील काळात प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिला बचत गटांसाठी रोजगार प्रशिक्षण असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...